You are currently viewing यामिनी

यामिनी

*संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे तथा जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी वि ग सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*यामिनी*

〰️〰️〰️

तुझ्याच त्या सुरम्य आठवात

जागते रे ही व्याकुळ यामिनी

 

वेचिता वेचिता भावफुलांना

गीतातूनी गुंफिते प्रीतपावनी

 

स्वरताली आभाळ आलापी

निष्पाप बरसते रे अंतरातुनी

 

शब्दभावनांचे स्पर्श अबोली

मौनी मिठीतच जाती मिटुनी

 

सुरावटीची ही मंगल मैफिल

निरागस निर्मली आनंदघनी

 

तुझ्याच त्या सुरम्य आठवात

जागते रे ही व्याकुळ यामीनी

〰️〰️〰️〰️〰️〰️

*©️वि.ग.सातपुते.(भावकवी )*

📞 *(976654908)*

प्रतिक्रिया व्यक्त करा