You are currently viewing कास गावचे सरपंच प्रविण पंडित यांना आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर

कास गावचे सरपंच प्रविण पंडित यांना आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर

भाजप युवा नेते विशाल परब व ॲड. अनिल निरवडेकर यांच्या हस्ते सत्कार

 

सावंतवाडी :

महाराष्ट्र राज्याचा प्रतिष्ठेचा ‘आदर्श सरपंच’ पुरस्कार नुकताच कास गावचे सरपंच प्रविण पंडित यांना जाहीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप युवा नेते विशाल परब आणि ॲड. अनिल निरवडेकर यांनी पंडित यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव केला.

आपल्या कार्यकाळात कास ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे आणि आदर्श निर्मितीबद्दल त्यांना हा राज्यस्तरीय महत्त्वाचा पुरस्कार मिळाला असून, तालुक्यातील सरपंच पदाचा मानाचा तुरा त्यांनी रोवला आहे.

या वेळी बोलताना युवा नेते विशाल परब म्हणाले, “प्रविण पंडित यांच्या नेतृत्वाने कास ग्रामपंचायतीत नवी दिशा मिळाली आहे. ग्रामीण विकासाचे त्यांचे कार्य निश्चितच इतरांसाठी प्रेरणादायी आहे.” तर ॲड. अनिल निरवडेकर यांनी श्री. पंडित यांच्या पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या सत्कार सोहळ्यास विठ्ठल पंडित, श्रीकांत पंडित, जयवंत पंडित, प्रमोद पंडित, समीर किंडलेंकर, गोपाल पंडित, नकुल पंडित, पांडुरंग पंडित, देवांग पंडित, वैभव पंडित, रूपेश पंडित आदी मान्यवर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा