You are currently viewing माजी सैनिकांसाठी कौशल्य प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन

माजी सैनिकांसाठी कौशल्य प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन

माजी सैनिकांसाठी कौशल्य प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी 

जिल्ह्यातील माजी सैनिकांना कौन्सिलिंगव्दारे कौशल्य प्रशिक्षण देण्याकरीता १० ऑक्टोंबर पर्यंत नावाची नोंद करावी, असे  निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे.

             उपरोक्त विषयी कळविण्यात येते की, संचालक, सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी अन्वये ज्ञानदीप समाज विकास संस्था संचलित कॅरिअर डेव्हलपमेंट व रिसर्च इन्स्टिटयूट, ही संस्था पुणे येथे मोठ्या प्रमाणात कौशल्य विकास प्रशिक्षणाचे काम करत आहे. तसेच ज्या माजी सैनिकांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची ईच्छा आहे, अशा माजी सैनिकांना फोनव्दारे कौन्सिलिंग करुन प्रशिक्षण देणार असल्याचे कॅरिअर डेव्हलपमेंट व रिसर्च इन्स्टिटयूट, पुणे या संस्थेने कळविले आहे.

जिल्ह्यातील मागिल १० वर्षांत सैन्यातुन निवृत्त झालेल्या माजी सैनिकांनी सैन्यसेवा पुस्तक, माजी सैनिक ओळखपत्रासह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग येथे दिनांक १० ऑक्टोबर  पर्यंत कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष भेट देऊन आपल्या नावाची नोंद करावी किवा दुरध्वनी क्र-०२३६२-२२८८२०/९३२२०५१२८४ वर माहीती सादर कराची. अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्र. ०२३६२-२२८८२०/९३२२०५१२८४ वर संपर्क करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मच्छिद्र सुकटे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा