*संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे तथा जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य कवी वि ग सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*
*पूर्वप्राक्तन*
〰️〰️〰️〰️
उदय अस्त निसर्ग किमया
चक्रधराचे ऋतूचक्रच आहे
जन्म मृत्यूचे हे जुळेच नाते
आपणच उमजायाचे आहे
सडा प्रांगणीचा पूर्वप्राक्तनी
तिथे जीवा रमवायाचे आहे
ऋणानुबंधीच गाठी इथल्या
त्यात गुंतूनी जगायचेच आहे
जगणे हे सारीपाटी सोंगट्या
कर्माचाच अतर्क्य खेळ आहे
जेजे पेरले ते तेच इथे भोगावे
हा दैवगतीचा सिद्धांतच आहे
येता जाता रित्याच ओंजळी
हीच जीवनाची सांगताच आहे
सत्कर्माचा वसा विवेके जपूनी
जगणेच आपुल्या हाती आहे
वि:स्मृतीचेच दान हे जीवाला
दुःख वेदनांचे परिमार्जन आहे
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*©️ वि.ग.सातपुते.( भावकवी)*
*📞( 9766544908)*

