_*भोसले फार्मसी कॉलेजमध्ये ‘करिअर कट्टा विद्यार्थी संवाद’…..*_
सावंतवाडी
_महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘करिअर कट्टा विद्यार्थी संवाद’ हा कार्यक्रम यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी, सावंतवाडी येथे उत्साहात पार पडला._
_या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी मोबाईल फोन व सोशल मिडियाचा वापर केवळ मनोरंजनासाठी न करता करिअर घडवण्यासाठी करावा, असे सांगितले. तसेच ऑनलाइन कोर्सेस, नेटवर्किंग, नवीन संधींचा शोध, कौशल्य सादरीकरण इत्यादीसाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा प्रभावी वापर करावा, असे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले._
_यावेळी भोसले नॉलेज सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ले. कर्नल रत्नेश सिन्हा, करिअर कट्टा जिल्हा प्रवर्तक डॉ. डी. एल. भारमल, जिल्हा समन्वयक डॉ.अजित दिगे, प्राचार्य डॉ. विजय जगताप, डॉ.स्मिता सुरवसे, तालुका समन्वयक डॉ. रमाकांत गावडे, प्रा.अजित कानशिडे, डॉ.नीलम धुरी, अक्षता मोंडकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन प्रा.प्रिया यादव व प्रा.नमिता भोसले यांनी केले._

