महामार्ग चौपदरीकरण कामात सुरू असलेली दिरंगाई आणि दर्जाहीन कामे यावर कदम यांनी व्यक्त केला तीव्र संताप
सर्वपक्षीय लोकांना एकत्र करून टोलमाफी करीता उठाव करणार
चिपळूण
रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण कामात ठेकेदारांकडून दिरंगाई सुरू असून अनेक ठिकाणी दर्जाहीन कामे झाली आहेत,२०२४ पर्यंत काम होणे अशक्य असल्याचे सांगून रत्नागिरी जिल्ह्यावासीयांकरिता केंद्र सरकारने टोल आकारू नये अन्यथा शिवसेना स्टाईल ने विरोध केला जाईल केंद्र सरकारच्या वतीने २०१७ रोजी दिलेले टोलमुक्तीचे आश्वासन पूर्ण करावे असे शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम,शिवसेना चिपळूण संगमेश्वर विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम यांनी शिवसेना शहरप्रमुख उमेश सकपाळ यांच्या संपर्क कार्यालयात सोमवारी आयोजित पत्रकार परिषद मध्ये सांगितले,या वेळी शिवसेना चिपळूण तालुका समन्वयक राजुशेठ देवळेकर,चिपळूण शिवसेना शहर प्रमुख उमेश सकपाळ,चिपळूण नगर पालिका आरोग्य समिती सभापती,जिल्हा नियोजन समिती सदस्य शशिकांत मोदी,बांधकाम समिती सभापती मनोज शिंदे आदी पत्रकार परिषद ला उपस्थित होते,
मुंबई गोवा महामार्ग व्हावा या करिता शिवसेनेने सुरवातीपासून पाठपुरावा केला मोदी सरकार मध्ये आमचे नेते माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते,रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार विनायक राऊत यांनी त्या वेळी प्रयत्न केल्या मुळे २०१७ ला महामार्गाचे भूमिपूजन झाले हा मार्ग दीड वर्षात पूर्ण होईल असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आश्वासन दिले होते,परंतु हे काम पूर्णपणे रखडले असून संबंधित ठेकेदार अपयशी ठरला आहे,२०२४ पर्यंत हा रस्ता पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे,
केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी भूमिपूजन वेळीच येथे नागरिकांना टोल बसणार नाही अशी घोषणा केल्यावर येथील जनतेने यांचे स्वागतच केले,डिसेंम्बर २०१८ मध्ये हा महामार्ग लोकार्पण होईल असे जाहीर करण्यात आले होते,परंतु आज २०२१ मधेही ठेकेदाराकडून काम पूर्ण झालेले नाही सध्या ज्या पद्धतीने रस्त्याचे काम सुरू आहे त्यावर नॅशनल हायवे बांधकाम विभागाचा अंकुश राहिलेला नाही कामाचा दर्जा कामावर अपेक्षित असलेली अधिकारी वर्गाची देखरेख ठेकेदार टेंडर मध्ये नमूद गोष्टीची पूर्तता करतोय का कामाचा दर्जा आहे का या आणि अशा अनेक गोष्टीकडे अधिकारी वर्गाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष सुरू आहे,काम सुरू असताना ठेकेदाराने नागरिकांसाठी पर्यायी रस्ता उपलब्ध करून देणे टेंडरमध्ये नमूद आहे ठेकेदाराकडून अनेक ठिकाणी दर्जाहीन कामे सुरू आहेत नागरिकांची सतत ओरड आहे,या ठेकेदाराला एवढी मस्ती आहे कामात लोकांसाठी सेफ्टी पाळली नाही त्या मुळे या मार्गात अनेकवेळा अपघात झाले आहेत,अनेकांचे बळी गेले आहेत या भितीने लोकांना शाररीक,आर्थिक,मानसिक खूप त्रास सहन करावा लागत आहे,ठेकेदाराकडून नगरिकांसाठी मार्गदर्शक रूपरेषा नाही कामात सुरू असलेल्या दिरंगाई मुळे लोकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे,त्या मुळे आम्ही सर्व पक्षीय मंडळींना एकत्र करून टोलमाफी करीता शिवसेना आग्रही राहील असे शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी पत्रकार परिषद मध्ये सांगितले,