इचलकरंजी / प्रतिनिधी :
इचलकरंजी येथील खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल एन.डी.मगदूम प्राथमिक विद्या मंदिरच्या शिक्षिका सौ.मीनाक्षी विनायक रायकर यांना नवदुर्गा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.या पुरस्काराचे वितरण प्रमुख पाहुणे डाॅ.श्रीधर जाधव यांच्या हस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
एन.डी.मगदूम विद्या मंदिरच्या शिक्षिका सौ.मिनाक्षी रायकर यांनी मुलांना अध्यापन करण्याबरोबरच त्यांच्यातील सुप्त कलागुणांना अधिक वाव देण्याच्या दृष्टीने विविध माध्यमातून प्रयत्न सुरु ठेवला आहे.त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊनच त्यांची
इचलकरंजी येथील खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीच्या वतीने नवदुर्गा गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.या पुरस्कार वितरण प्रसंगी खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे अध्यक्ष प्रशांत गुरव, कार्याध्यक्ष सचिन वारे, कार्याध्यक्षा शितल खानाज, खजिनदार बसगोंडा पाटील यांच्यासह समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. दरम्यान, या पुरस्काराबद्दल श्री.शांतिनाथ एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संतोष पाटील यांनी शिक्षिका सौ.मिनाक्षी रायकर यांचे अभिनंदन करुन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी एन.डी.मगदूम विद्या मंदिरचे मुख्याध्यापक अशोक पाटील यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
