You are currently viewing जाती धर्म

जाती धर्म

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*जाती धर्म*

 

पुस्तकाची पानं चाळावीत,

तसा धर्म चाळला जातो.

जाती-पातीचा रंग उधळून

आत्मसन्मान जाळला जातो

 

धर्माचा रंग बदलवला म्हणून,

जाती-जातींत विभागणी झाली.

याने,त्याने,इथे,तिथे कुठे कुठे,

जातीची जत्रा भरवली.

 

अरे,जातीलाही रंग असतात हे,

जातीला तरी कुठे माहित होते?

जातीच्या रंगात हरवलेल्या माणसांमुळे

आता जात ओळखली जाते.

 

“मी या जातिचा,मी त्या जातिचा”,

धर्माबद्दल कोणी काही बोलतं का?

जातीधर्माच्या एकोप्याची,

मागणी कोणी करतं का?

 

अरे,यांच्या-त्यांच्या चष्म्यातून,

जातीचे रंग पाहिले जातात.

एकाच मुद्याचा हट्ट धरून,

किती जातींचे मफलर घालून फिरतात!

 

लक्षात ठेवा जात हाताशी धरून,

धर्म बुडवला जातोय.

मतभेदाचा रंग उधळून,

माणूस माणसापासून वेगळा होतोय.

 

मर्मावर घाव घालून उगाचच

जात आणि धर्माचा शंखनाद करतात

याचा त्याचा उसना आधार घेऊन

स्वतःची ओळख गमवून बसतात

 

खरचं

अधर्म आणि द्वेषाच्या गर्दीत

माणसाचं माणूसपण हरवून गेलं

कळतं नाही कुणाच्या भल्यासाठी

जात आणि धर्माच वस्त्रहरण झालं

 

*संजय धनगव्हाळ*

*(अर्थात कुसूमाई)*

९५७९३५४७

९४२२८९२६१८

प्रतिक्रिया व्यक्त करा