You are currently viewing महेंद्रा अकॅडमीचा आदित्य राऊळ ‘नमो युवा रन’ मॅरेथॉनचा विजेता

महेंद्रा अकॅडमीचा आदित्य राऊळ ‘नमो युवा रन’ मॅरेथॉनचा विजेता

महेंद्रा अकॅडमीचा आदित्य राऊळ ‘नमो युवा रन’ मॅरेथॉनचा विजेता

नशामुक्तीचा दिला आरोग्यदायी संदेश

सावंतवाडी

सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने सावंतवाडी येथे आयोजित ‘नमो युवा रन’ मॅरेथॉन स्पर्धेत महेंद्रा अकॅडमीत शिकणाऱ्या आदित्य राऊळ याने ५ किलोमीटर अंतराची शर्यत जिंकत प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेच्या माध्यमातून नशामुक्त समाज आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देण्यात आला.

या मॅरेथॉन स्पर्धेचे यशस्वी आयोजन भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप गावडे यांनी केले. या उपक्रमाला मोठ्या संख्येने युवक-युवतींचा सहभाग लाभला. ‘नमो युवा रन’द्वारे समाजात व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

कार्यक्रमास प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखम राजे भोसले, जिल्हा उपाध्यक्ष संदीप गावडे, राजू राऊळ, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, वेंगुर्ल्याचे माजी नगराध्यक्ष राजन गिरप, जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष सिद्धेश चिंचळकर, सरचिटणीस संतोष पुजारे, तसंच तन्मय वालावालकर, सर्वेश दळवी, सागर राणे, रविंद्र माडगावकर, संतोष राऊळ, हितेन नाईक, निलेश पास्स्ते, सिद्धेश कांबळी, प्रणव वायंगणकर आदी अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या मॅरेथॉनद्वारे युवांमध्ये आरोग्यविषयी जागरुकता निर्माण झाली असून, भविष्यात असे उपक्रम सातत्याने राबवले जातील, असे आयोजकांनी सांगितले.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा