सडूरे शिराळे ग्रामपंचायतची वेबसाईट पर्यटन दिनी अनावरण —
ऑनलाईन उपस्थितीत पालकमंत्री नितेश राणे, जगाच्या नकाशावर गावाचं नाव कोरण्याचा संकल्प
सडूरे शिराळे
पर्यटन दिनाचे औचित्य साधत ग्रुप ग्रामपंचायत सडूरे शिराळे यांच्या अधिकृत वेबसाईटचे अनावरण ऑनलाईन व्हिडिओद्वारे सन्माननीय पालकमंत्री श्री. नितेश राणे साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले.
या कार्यक्रमात राणे साहेबांनी ग्रामपंचायतीच्या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, “सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटन जिल्हा जाहीर करून, रोजगार निर्मितीस चालना देण्याचा संकल्प आम्ही अमलात आणला. ग्रामपंचायत सडूरे शिराळे यांचाही हा पुढाकार कौतुकास्पद आहे.”
सुप्रसिद्ध यूट्युब ब्लॉगर श्री. प्रसाद गावडे यांची देखील ऑनलाईन उपस्थिती लाभली. त्यांनी आपल्या भाषणात गावाच्या साधन संपत्तीचा उपयोग पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीसाठी करण्याचा उपसरपंच नवलराज काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मानसाचे कौतुक केले. त्यांनी लवकरच प्रत्यक्ष गावात भेट देऊन सडूरे शिराळेच्या पर्यटन प्रसाराला चालना देण्याचे आश्वासन दिले.
🌐 वेबसाईटचे अनावरण आणि सन्माननीय उपस्थिती
या वेळी कार्यक्रमात विशेष उपस्थिती लाभली ती:
तालुक्याचे तहसीलदार सूर्यकांत पाटील
पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रामचंद्र जंगले
कृषी विस्तार अधिकारी प्रकाश आडुळकर
सरपंच दीपक चव्हाण, उपसरपंच नवलराज काळे, माजी सरपंच विजय रावराणे
ग्रामसेवक प्रशांत जाधव, तसेच वेबसाईट क्रिएटर काजी साहेब व अन्य मान्यवर
तहसीलदार पाटील यांनी गावाला प्रशासनाकडून पूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. तर गटविकास अधिकारी जंगले यांनी या वेबसाईट उपक्रमाचे तालुक्याच्या पातळीवर कौतुक करत “समृद्ध पंचायतराज अभियान” अंतर्गत आदर्श कामगिरी असल्याचे गौरवले
🪔 कार्यक्रमाची सुरुवात व गौरव
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
ग्रामसेवक प्रशांत जाधव यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन केले.
उपसरपंच नवलराज काळे यांनी प्रस्तावना आणि आभारप्रदर्शन करत सर्व सहकार्य करणाऱ्या सरपंच, सदस्य, माजी पदाधिकारी व ग्रामस्थांचे मन:पूर्वक आभार मानले.
📢 उपसरपंच नवलराज काळे यांचा अभिमानाचा संदेश
> “पर्यटन दिनी वेबसाईटचे अनावरण हे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. गावातील साधन संपत्ती, संस्कृती, शेती, उत्पादन याची माहिती जगभर पोहोचेल. रोजगार निर्मितीचा माझा मानस पूर्ण होत आहे. ही निवडणुकीत दिलेल्या वचनपूर्तीतील एक पाऊल आहे.”
🔗 वेबसाईट लिंक
🖥️ ग्रामपंचायतची अधिकृत वेबसाईट पाहा:
🙌 गावाच्या नावाला जागतिक ओळख
या वेबसाईटमुळे सडूरे शिराळे गावाची ओळख आता केवळ जिल्ह्यात नाही तर जगाच्या पटलावर पोहोचणार आहे. यामुळे गावातील पर्यटनाला चालना मिळेल, आणि ग्रामस्थांसाठी नवीन रोजगार संधी निर्माण होतील, असा विश्वास ग्रामपंचायतने व्यक्त केला आहे.
