You are currently viewing कहाँ राजा भोज और कहाँ गंगू तेली!

कहाँ राजा भोज और कहाँ गंगू तेली!

मालवणच्या जनतेने धूळ चारलेल्या आमदार वैभव नाईकांनी देशाचे गृहमंत्री अमित शाहांच्या ताकदीबद्दल बोलणे म्हणजे विनोदच!!

सिंधुदुर्ग भाजपाचे प्रवक्ते बाबा मोंडकर यांची आमदार वैभव नाईक यांच्यावर घणाघाती टीका.

भाजपा नेते तथा केंद्रीय गृहमंत्री मा.अमितजी शाह यांनी काल एक ही मारा- लेकीन सॉलिड मारा!! कालपर्यन्त देवघरात ठरलेल्या गोष्टी म्हणत ज्या भूलथापा युतीचा विश्वासघात खपवायला मारल्या जात होत्या, त्या शाहांनी उघड्यावर पाडल्या. भर दुपारी केलेल्या या सर्जिकल स्ट्राईकने मातोश्री पुरी हडबडली, तोंडातून चकार शब्द उमटेनासा झाला आणि मग “एकनिष्ठपणा” दाखवायची संधी मिळालेल्या बेडक्या पोट फुगवून आपण बैल आहोत हे सिद्ध करण्याची केविलवाणी धडपड करायला लागले. त्यातलेच एक सिंधुदुर्गचे आमदार वैभव नाईक, अशी घणाघाती टीका भाजपा जिल्हा प्रवक्ते बाबा मोंडकर यांनी केली आहे.

विरोधात कोणत्याही पक्षाचे निवडणूक चिन्ह नसतानाही नवख्या रणजित देसाईंकडून कसाबसा निसटता विजय पदरी पडलेला हा शिवसेनेचा विद्यमान आमदार नारायणराव राणेंना धूळ चारण्याच्या गमजा करायला लागला आहे. आपल्याला यापुढे न मिळणारे शिवसेनेचे तिकीट राखण्यासाठी हे उद्योग चालले असले तरी थेट देशाच्या गृहमंत्र्यांच्या ताकदीला आव्हान देणारा हा आमदार म्हणजे “कहा राजा भोज और कहा गंगू तेली” अशा प्रकारच्या प्रतिक्रिया जनतेतून उमटू लागल्या आहेत.

गेल्या सत्तर वर्षात ज्या गोष्टी या देशात घडाव्यात यासाठी स्व.बाळासाहेब ठाकरे अक्षरशः तळमळत होते, त्या प्रत्येक इच्छेची पूर्तता मा.अमितजी शाह यांनी त्यांच्या गृहमंत्रीपदाच्या काळात केली. ते आमदार नाईक यांना माहीत नसणारच, कारण तेव्हा ते काँग्रेसच्या चड्डीत वावरत होते. ३७० कलम रद्द करणे असो, अयोध्येतील राममंदिर निर्माण शुभारंभ असो, सीएए आणि एनआरसी कायदे असो कित्येक गोष्टी त्यांनी सिंहाच्या काळजाने केल्या. साधा कुडाळ-मालवणचा रस्ता करायला न जमणारे आमदार वैभव नाईक अमितजी शाहांच्या कार्याचा विचारदेखील करू शकणार नाहीत. त्याऐवजी आपल्या मतदारसंघात कुडाळ मालवणचा दर्जाहीन रस्ता महिनोन महिने पुढे सरकत नाहीय, त्याकडे त्यांनी लक्ष दिला तरी पुरे.

पालकमंत्री होण्यासाठी दीपक केसरकर यांच्या विरोधात प्रचंड षडयंत्रे रचून, मातोश्रीच्या समोर लॉबिंग केले, पण तरीही वैभव नाईक यांच्यावर विश्वास न ठेवता सिंधुदुर्गचा पालकमंत्री हा जिल्ह्याबाहेरील केला गेला. शिवसेना पक्षप्रमुखांनीच मातोश्रीच्या अंगणातील धूळ चारलेल्या वैभव नाईक यांनी नारायणराव राणेसाहेबांवर टीका करणे हास्यापद आहेच, पण अमितजी शाह यांच्यावर टीका करणे म्हणजे निव्वळ पोरकटपणा आहे. प्रत्येक निवडणुकीत मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या फोटो व नावाचा वापर करून, दहशतीच्या नावाने मगरीचे अश्रू ढाळून निवडणूक जिंकलेल्या व हिंदूहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेबांच्या ज्वलंत हिंदुत्वाच्या विचारधारेला तिलांजली देऊन सत्तेची उब चाखणाऱ्या स्वार्थी आमदार वैभव नाईक यांना आता यापुढे मतदार संघातील जनताच धूळ चारणार आहे. याची सुरवात मालवण ग्रामपंचायत निवडणूकीतुन झालीच आहे. त्यामुळे अमित शाहांची ताकद आणि नारायणराव राणे यांची कारकीर्द याचा विचार करण्यापेक्षा आपले निश्चितपणे कापले जाणारे तिकीट कसे वाचवता येईल याचाच फक्त विचार आमदार वैभव नाईक यांनी करावा. नारायणराव राणेंवर टीका करून पालकमंत्रीपद मिळवायच्या स्वप्नांचा हसीन मुंगेरीलाल होऊ नये.

प्रतिक्रिया व्यक्त करा