You are currently viewing श्री तुळजाभवानी माता प्रसन्न

श्री तुळजाभवानी माता प्रसन्न

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*”श्री तुळजाभवानी माता प्रसन्न”*

 

तुळजा माता महाराष्ट्र कुलस्वामिनी वंदन

क्षात्रतेज आदिशक्ति करिते कल्याण रक्षणIIधृII

 

मंदिर आहे राष्ट्रकूट यादवकालीन प्राचीन

छत्रपती शिवाजी राजे होती चरणी लीन

स्वराज्य रक्षिण्या राजांना दिली तलवार देवीनंII1II

 

असंख्य भाविक येती दर्शनार्थ विश्वांतून

भगवतीचे रूप पाहून मन येई भरून

पुजारी करिती सुंदर पूजा वाटते प्रसन्नII2II

 

हेमाडपंथी मंदिरा आहेत प्रवेशद्वार दोन

राजे शहाजी दुसरे राजमाता जिजाऊ नावांन

पायऱ्या उतरल्यावर आहे गोमुख तीर्थII3II

 

कल्लोळ तीर्थासह देवी स्नानासाठी तीर्थ तीन

मुख्य द्वाराशी आहे सिद्धिविनायक गजानन

आदिशक्ती आदिमाया अन्नपूर्णा मंदिर साक्षीनII4II

 

मातंगी माता मंदिर यमाई देवी चे स्थान

जेजुरी खंडोबा मंदिर लक्ष घेती वेधून

साडेतीन पिठा पैकी पूर्ण शक्ती पीठ प्रसिद्ध II5II

 

अष्टभुजा काळया पाषाणाची मूर्ती आहे प्रसन्न

स्वयंभू मूर्ती महिषासुर मर्दिनी सिंहासनस्थ

केश संभार शिरी मुकुट शोभे विलसूनII6II

 

हाती त्रिशूल बिचवा बाण शंख चक्र पानपात्र

राक्षस शेंडी पाठीवर बाणांचा भाता रक्षणार्थ

उजव्याअंगी चंद्र डाव्या अंगी शोभे सूर्य लावण्यII7II

 

मातेची चल मूर्तीचे पालखी सोहळा अनन्य

दसरा रंगपंचमी काळभैरव भेंडोळी सण

दिवाळी नवरात्रांत हळदीकुंकू चाले उधळणII8II

 

छबिना मेघडंबरी पालखी सोहळा अनन्य

मंगळवार गुढीपाडवा पौर्णिमा सण होई संपन्न

भवानी माता जागृत देवग्स्थान करूया वंदनII9II

 

श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.

पिन.410201.Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा