You are currently viewing असून हडाचा “काव्यहरी”

असून हडाचा “काव्यहरी”

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*असून हडाचा “काव्यहरी”*

 

वंदन करून गणरायाला

रोज येते गंगा दर्शनाला

नसते मागणे *मातेकडे*

आनंद पोटभर गाठीला

//1//

पिऊन पाणी बारा गावचे

अनुभव गाठी बहू बांधला

हिरवाई मिरवते *सर्वत्र*

शारदा उत्सव *रंगून गेला*

//2//

नवरात्रातील नऊ दिवस

असतेस किती तू आनंदात

करतेस कविता *अनंत*

दिवस घालवितेस झोकात

//3//

नदी काठचा घालून रतीब

दर्शन देतेस सख्या हरिला

नाही देत घटकाभर झोपून

कविता लावतेस करायला

//4//

असून हाडाचा काव्य हरी

नाही घेतही क्षणभर झोप

लगेच लागे शब्द शोधायला

कवितेस सांगतो जरा थोप

//5//

घेऊन परेड सर्व शब्दांची

अर्थ सांगतो *समजावून*

गोंधळी सारे जमून मंदिरी

देतात तीज गजरा करून

//6//

हौशी मोठी *गजरेवाली*

गजरा माळते *सुवासिक*

कळून येते *लांबून सुध्दा*

भरपूर होते मग *कौतुक*

//7//

 

विनायक जोशी 🖋️ठाणे

मीलनध्वनी/9324324157

प्रतिक्रिया व्यक्त करा