You are currently viewing श्रीमती सुधा मुर्ती..

श्रीमती सुधा मुर्ती..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

   *श्रीमती सुधा मुर्ती…*

 

सुधा म्हणजे अमृत असते, ज्ञानामृत ही प्याली

इतक्या पूर्वी झगडून कम्प्युटर इंजिनियर झाली..

मिळत नव्हती ॲडमिशन हो, प्रवेश नाकारला

चिडली सुधा नि सुधेचा मग अहंकार दुखावला..

झगडा सुरू केला तिने अन् थेट वर भिडली

लढता लढता व्यवस्थापनाची खासच जिरवली..

 

तल्लख होता मेंदू तल्लख आहे बघतो आहोत सारे

कर्तृत्वाची शिखा फडकली मन सुंदर असणारे

इतकी निगर्वी नाही पाहिली महिला मी अजुनी

रस्त्यावरती भाजी विकते चार दिवस बसुनी..

 

मातीशी ती नाळ असावी पाउले ही ताळ्यावर

गरजूंना ती बांधून देते घरटे हो सत्वर

किती लेखणी अजरामर हो किती बुकांची धनी

नारायणाला सुधा मिळाली अमृत ते जीवनी…

 

धावून जाते गरजूंसाठी सदा हो हात असे वरती

कमांड व्यवस्थापनावर आहे शिवाय लेखन करती

सहज सुंदर लिहिते पहा हो नवनित अनुभव

किती जनांना उपकृत केले तरी किती मार्दव

 

सहज वावरे सहज बोले राहणी ही अगदी साधी

पाय धुवावे पाणी प्यावे खरी शोभते राज्ञी

आदर्शाची असून पुतळी सदा जमिनीवर

तिच्या सारखे बनव आम्हा दे देवी आम्हा वर..

 

सारी पुस्तके वाचून पहावी तेव्हा कळती माणसे

एकजरी हो गुण घेतला होता येईल थोडेसे तसे..

 

प्रा. सौ. सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा