बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा ऐतिहासिक उपक्रम; इतिहास अभ्यासक राधेय पंडित यांचे मार्गदर्शन ठरले आकर्षण
रत्नागिरी :
बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट रत्नागिरी प्रस्तुत “गाथा रत्नदुर्गाची” हा एक ऐतिहासिक उपक्रम दिनांक २७ सप्टेंबर २०२५ रोजी म्हणजेच पर्यटन दिनी रत्नदुर्ग किल्ला येथे उत्साहात यशस्वीरित्या पार पडला.
बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ने एक पर्यटन दृष्ट्या माहिती आणि ऐतिहासिक आठवणींना उजाळा देण्यासाठी हा कार्यक्रम राबविण्याचे ठरवले कोकण चे सुपुत्र आणि प्रख्यात इतिहास विषय युट्युबर श्री. राधेय पंडित यांनी पुढाकार घेत रत्नदुर्गाच्या सर्व ऐतिहासिक स्थानांना न्याहाळत रत्नदुर्गाच्या सर्व जागा अगदी नाविन्यपूर्ण आणि अचूक मार्गदर्शन करून प्रकाश झोतात आणल्या किल्ले रत्नदुर्गाच्या अगदी प्रवेशद्वारापासून ते दुर्गावरील सर्व बुरुज आणि तटबंदी याची सखोल माहिती त्यांनी दिली आणि त्याबद्दल त्यांना आणि बाया कर्वे इन्स्टिट्यूटच्या सर्व कर्मचाऱ्यांना पदाधिकाऱ्यांना जमलेल्या सर्व स्तरातील मंडळींनी कौतुक करत नावाजले.
या उपक्रमाला रत्नागिरी मधील नागरिकांनी आणि विद्यार्थी वर्गाने आनंदाने हजेरी लावत या कार्यक्रमाची शोभा वाढविली तसेच रत्नदुर्ग वरील संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आनंदाने बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चे स्वागत केले.
या सर्व उपक्रमाला बाया कर्वे व्हो व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या हॉस्पिटल अँड टुरिझम या विभागनी इन्स्टिट्यूटच्या अकॅडमीक कॉर्डिनेटर साधना ठाकूर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम अतिशय चणाक्षपणे हाताळत यशस्वी केला.तसेच इन्स्टिट्यूटच्या इतर विभागांमधून जसे फॅशन डिझायनिंग इंटेरियर डेकोरेशन आणि ब्युटी अँड सलोन सर्व विद्यार्थी वर्गाने या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवत कार्यक्रम सुंदर पार पडला.

