You are currently viewing आंतरराष्ट्रीय किनारे स्वच्छता दिनानिमित्त मालवण दांडी किनाऱ्यावर स्वच्छता अभियान

आंतरराष्ट्रीय किनारे स्वच्छता दिनानिमित्त मालवण दांडी किनाऱ्यावर स्वच्छता अभियान

NCCR व श्री पंचमखेमराज महाविद्यालयाच्या पुढाकाराने विविध संघटनांचा सहभाग

युवराज लखम सावंत भोसले यांच्या हस्ते उद्घाटन

मालवण :

राष्ट्रीय तटीय अनुसंधान केंद्र (NCCR), पृथ्वी विज्ञान मंत्रालय, भारत सरकार यांच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय किनारे स्वच्छता दिनानिमित्त ‘किनारे स्वच्छता अभियान’ आयोजित करण्यात आले आहे. या अभियानाचे उद्घाटन श्री पंचमखेमराज महाविद्यालय, सावंतवाडी (स्वायत) यांच्या वतीने सोमवार, दि. २९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ८ वाजता मालवण दांडी समुद्रकिनारी होणार आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष व मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य युवराज लखम सावंत भोसले यांच्या हस्ते होणार आहे.

या अभियानात महाविद्यालयातील NSS व NCC विभागाचे विद्यार्थी व प्राध्यापक सहभागी होणार असून, मालवण नगरपरिषद, युथ बीटर्स फॉर क्लायमेट (मालवण), मेरिटाईम बोर्ड (मालवण), इकोमेट (मालवण), कांदळवन विभाग (मालवण), पर्यटन व्यवसायिक महासंघ सिंधुदुर्ग, तसेच नीलकांती कृषी व मत्स्य पर्यटन (मालवण) यांचे पदाधिकारीही सहभागी होणार आहेत.

अभियानादरम्यान दांडी समुद्रकिनाऱ्यावरिल प्लास्टिक व अन्य कचरा गोळा करून तो मालवण नगरपरिषदेकडील स्वच्छता विभागाकडे सुपूर्द केला जाणार आहे.

या उपक्रमात सहभागी होऊन समुद्रकिनारा स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने हातभार लावावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा