*मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियान कार्यशाळा महाळुंगे येथे संपन्न*
देवगड –
राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियान १७ सप्टेंबर पासून राज्यात सुरु झाले आहे, या अभियानाची सविस्तर माहिती देण्यासाठी महाळुंगे ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामपंचायत उपसमिती सदस्य यांची कार्यशाळा संपन्न झाली, या कार्यशाळेचे औपचारिक उदघाटन सह गटविकास अधिकारी दिगंबर खराडे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आले यावेळी विस्तार अधिकारी दीपक तेंडुलकर,ग्रामसेवक आबा हिरवे, सरपंच संदिप देवळेकर, किंजवडे सरपंच संतोष किंजवडेकर, बापर्डे सरपंच संजय लाड, अभियानाचे पर्यवेक्षक सुनील मांजरेकर उपस्थित होते.
कार्यशाळेचे संयोजक रामकृष्ण राणे यांनी ओयजानामागची भूमिका विशध केली, ग्रामपंचायत पहिल्यांदा अशा उपक्रमात सहभाग घेत असल्याने सर्वांमध्ये उत्साह आहे,यावेळी स्पर्धेचे नियम व यामागची शासनाची भूमिका सह गट विकास अधिकारी दिगंबर खराडे यांनी विषध केली तर विस्तार अधिकारी दीपक तेंडुलकर यांनी स्पर्धेकडे गावच्या विकासाच्या दृष्टीने पाहून पूर्तता केलीत तर यश नक्की मिळेल सांगितले, कोणत्याही स्पर्धेत नेहमी अव्वल स्थानी राहणारी ग्रामपंचायतकिंजवडे सरपंच संतोष किंजवडेकर यांनी आत्मीयतेने त्यांचे स्पर्धेसाठी काम करतानाचे अनुभव कथन केले तर बापर्डे सरपंच संजय लाड यांनी छोट्या छोट्या कृतीतून गुण कसे प्राप्त करता येतात याबाबत माहिती दिली
ग्रामसेवक आबा हिरवे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले कार्यक्रमाचे संचलन रामकृष्ण राणे यांनी केले
