You are currently viewing श्री स्वामी समर्थ काव्य वंदना काव्यपुष्प-४२ वे 

श्री स्वामी समर्थ काव्य वंदना काव्यपुष्प-४२ वे 

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी अरुण वि देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

।।श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।।

__________________________

श्री स्वामी समर्थ काव्य वंदना काव्यपुष्प-४२ वे 

श्री स्वामी भ्रमण गाथा ..

___________________________

 

रामेश्वराहून श्री स्वामी प्रकटले । ते शिवकांची व विष्णुकांची या क्षेत्री दिसले । इथले जहागीरदार ,याच वेळी मोठ्या अडचणीत सापडले ।।१।।

या प्रदेशाच्या राजाने त्यांना फर्मावले । सादर करावे तुमचे दस्तावेज, हे जर नाही केले ।तर , याचे परिणाम नसतील चांगले । जप्त केली जाईल तुमची जहागीर ।।२।।

 

जहागिरदारांचा सारा तोरा उतरला । डोळ्यावरचा पडदा दूर झाला । प्रश्न मोठाच उभा राहिला । त्यांच्यापुढे, उपासमार थांबेल कशी ? ।।३।।

 

आता जहागिरी गेली । भ्रांत त्यास पडली । मनाची चिंता वाढली । दिवस कसे काढायचे ? ।।४।।

 

त्यांनी आराधना सुरू केली । देवाची करुणा भाकली ।

वेळ फार वाईट आली । देवा ,संकट हे दूर करावे ।।५।।

 

स्वामींचे आगमन , वृत्त जहागिरदारास कळले । लगेच ते स्वामींच्या दर्शनास आले । घोर संकट आले । हे, कथिले सविस्तर स्वामींना ।।६ ।।

 

बोलवा राजाच्या अधिकाऱ्यांना, स्वामी म्हणाले । ते अधिकारी भेटायास आले । स्वामी त्यांना बोलले, जर जहागिरदारांचे अधिकार तुम्हास दाखवले । तर, द्याल का

सारे अधिकार परत त्यांना ? ।।७।।

 

राजाच्या अधिकाऱ्यांनी संमती दर्शवली । स्वामींच्या शब्दाप्रमाणे,समोरच्या नदीतून काढली । एक शिळा पडलेली । त्यावर माहिती दिसली तपशीलवार ।।८।।

 

अधिकाऱ्यांनी ते वाचले । समाधान त्यांचे झाले । जहागिरदारांना अधिकार परत मिळाले । संकट टाळले स्वामींनी ।।९ ।।

 

“अशक्य ते शक्य केले “स्वामींनी । हे पाहिले सर्व लोकांनी ।

जहागीरदार संतोषे मनोमनी । ते लीन झाले स्वामी चरणी ।।

**************************

करी क्रमशः हे लेखन कवी अरुणदास

___________________________

कवी अरुणदास “अरुण वि.देशपांडे- पुणे.

_____________________________

प्रतिक्रिया व्यक्त करा