मिलाग्रिस हायस्कूलची विद्यार्थिनी मेहविश शेख हीचे निधन
सावंतवाडी:
येथील मिलाग्रिस हायस्कूलमधील आठवीची विद्यार्थिनी कुमारी मेहविश जुबेर शेख हिचे आज, अल्पशा आजाराने निधन झाले. तिच्या निधनाची बातमी कळताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
मेहविश ही शाळेतील एक हुशार आणि होतकरू विद्यार्थिनी म्हणून ओळखली जात होती. तिच्या या अकाली जाण्याने शाळा व्यवस्थापन, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकवर्गामध्ये शोककळा पसरली आहे. शाळेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदाना यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
अतिशय नम्र आणि मनमिळावू स्वभावाच्या मेहविशच्या निधनाने शाळेतील प्रत्येकालाच मोठा धक्का बसला आहे. तिच्या निधनाने एक चांगला विद्यार्थी गमावल्याचे दुःख शाळेला झाले आहे.
मिलाग्रिस हायस्कूलच्या वतीने मेहविशला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.
