मालवण
अहमदनगर येथे दि. २० व २१ फेब्रुवारी रोजी ३४ वी सबज्युनियर (१७ वर्षाखालील) आणि ज्युनियर (१९ वर्षाखालील) शूटिंगबॉल राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा होणार असून यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संघ सहभागी होणार आहे. यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा सबज्युनियर/ ज्युनियर (मुले मुली) अजिंक्यपद निवड चाचणी शिबिर १३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ यावेळेत कुडाळ येथील मराठा हॉल नजीक आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरासाठी वैयक्तिक खेळाडू किंवा संघ उपस्थित राहू शकतात. १९ वर्षासाठी १- १- २००२ पासून पुढे आणि १७ वर्षासाठी १- १- २००४ पासून पुढे जन्मतारीख ग्राह्य धरण्यात आली आहे. खेळाडूंनी येताना पासपोर्ट साईज दोन फोटो, मुख्याध्यापकांच्या सहीचा अधिकृत जन्मतारखेचा दाखला व आधारकार्डची झेरॉक्स आणावी. या शिबिरात सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी राजा देसाई – ८२७५८६५३०३ व एकनाथ केरकर – ९४२११४७१७२ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.