You are currently viewing भव्य रक्तदान शिबिरात १५६ दात्यांचा सहभाग

भव्य रक्तदान शिबिरात १५६ दात्यांचा सहभाग

पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती व पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पडेल मंडळात सेवा पंधरवडा यशस्वी..

 

देवगड :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा वाढदिवस आणि पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती या त्रिसंयोगाचे औचित्य साधत भाजपाच्या पडेल मंडळाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले. या शिबिरात तब्बल १५६ दात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली.

सेवा पंधरवडा अभियानांतर्गत फणसगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे हे शिबिर पार पडले. शिबिराची सुरुवात पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.

मागील आठवड्यात किल्ले विजयदुर्ग येथे स्वच्छता मोहिमेने प्रारंभ केलेल्या सेवा पंधरवड्याचा पुढील टप्पा म्हणून हे रक्तदान शिबिर पार पडले. हे शिबिर यशस्वी करून १५६ रक्तदात्यांनी मोदींच्या कार्याला दिलेला हा सलामच आहेत,” असे मंडळ अध्यक्ष बंड्या नारकर यांनी सांगताना दात्यांचे अभिनंदन केले.

या यशस्वी उपक्रमासाठी लाईफ टाईम हॉस्पिटल रक्तपेढी तसेच फणसगाव आरोग्य केंद्रातील अधिकारी व तंत्रज्ञ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सर्वांच्या सहकार्यासाठी मंडळाच्या वतीने अध्यक्ष नारकर यांनी मनःपूर्वक आभार मानले.

या प्रसंगी मंडळ अध्यक्ष महेश नारकर, रवी पाळेकर, अमोल तेली, रामकृष्ण राणे, संजय बोंबडी, संजना आळवे, अंकुश ठुकरूल, रामकृष्ण जुवाटकर, संजय लाड, भूषण पोकळे, प्रवीण पास्ते, विश्वनाथ खानविलकर, संतोष चव्हाण, कृष्णा नर, राजन लाड, राजू जठार, उदय पाटील, महेश पडवळ, कल्पेश नारकर, भाई नारकर, गणेश नारकर, सादिक डोंगरकर, दीपक परब आदी पदाधिकारी व सरपंच उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा