You are currently viewing वाघेरी गावात कृषीकन्यांकडून भव्य कृषी मेळावा संपन्न

वाघेरी गावात कृषीकन्यांकडून भव्य कृषी मेळावा संपन्न

वाघेरी गावात कृषीकन्यांकडून भव्य कृषी मेळावा संपन्न

– आधुनिक शेती तंत्रज्ञान व योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत

फोंडाघाट (ता. कुडाळ):

कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय, फोंडाघाट येथील अंतिम वर्षाच्या कृषीकन्यांनी “ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम” अंतर्गत वाघेरी गावात दि. ८ ऑगस्ट रोजी एक भव्य कृषी मेळाव्याचे आयोजन केले.

या मेळाव्याचे उद्घाटन गावच्या सरपंच सौ. अनुजा राणे यांच्या हस्ते पार पडले. प्रमुख पाहुणे म्हणून कृषी सहाय्यक श्री. निलेश कावले, ग्रामसेवक अयाज हवालदार, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. पंकज संते, प्राध्यापक साईराम चव्हाण तसेच स्थानिक कृषी सहकारी संस्थांचे पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

कृषीकन्या कल्याणी पाटील, प्रिया नागरगोजे, प्रद्न्या देशमुख, प्रांजल भोसले, समृद्धी कुराडे, साईश्वरी निकम, लावण्या झोरे, प्रगती जाधव, नम्रता महामुनी, निकिता कावनेकर व ज्योतीला कंदले यांनी मेळाव्याचे यशस्वी आयोजन केले.

मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खालील विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले:

सुधारित बियाणे उत्पादन पद्धती

संतुलित व सेंद्रिय खत व्यवस्थापन

मृदा परीक्षणाचे महत्त्व व प्रक्रिया

पाणी बचत तंत्रज्ञान

कीड व रोग नियंत्रण उपाय

हवामान आधारित पीक नियोजन

बाजारपेठेतील नव्या संधी

रानभाज्या व आयुर्वेदिक वनस्पतींचे उपयोग

विविध शासकीय योजनांची माहिती

मेळाव्यात कृषी सहाय्यक श्री. कावले यांनी इ-पिक पाहणी प्रणालीविषयी माहिती दिली तर ग्रामसेवक अयाज हवालदार यांनी विविध कृषी संलग्न विषयांवर मार्गदर्शन केले.

शेतकऱ्यांच्या अडचणी व शंका थेट समोरून ऐकून त्याचे समाधानकारक उत्तर उपस्थित तज्ज्ञांनी दिले. या उपक्रमामुळे वाघेरी गावातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान व योजनांचा थेट लाभ मिळण्यास मदत झाली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा