*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी अरुणजी देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
।। गण गण गणात बोते ।। ।।जय गजानन श्री गजानन ।।
___________________________
श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प – ११७ वे
अध्याय – १९ वा , कविता – ९ वी
___________________________
हरी जाखडी नावाच्या ब्राम्हणाची । माणसांच्या स्वभावाची ।
ही गोष्ट मार्मिक साची । समजून घ्या अर्थ यातला ।।१।।
याची परिस्थिती खडतर । पोटासाठी करी मरमर । खायला कधी ना मिळे पोटभर । हा आला फिरत फिरत शेगावी ।।२।।
मठात बैसे स्वामींच्या दर्शना। मनात याच्या विचार नाना ।
पूर्ण व्हावी संसार-सुख -वासना । ईच्छा ही पूर्ण करा, करी हा स्वामींना प्रार्थना ।। ३।।
ऐकुनी हे , स्वामी म्हणे लोकांना । बघा,या मूर्खांची वासना।
करी हा मज याचना । संसार सुखाची ।।४ ।।
तरी जाखड्याची इच्छा पूर्ण केली स्वामींनी । परी केली त्याची कानउघाडणी । आता तरी ,हरीचा आठव कर मनी ।
बोले स्वामी जाखड्याला ।।५ ।।
निमोणकर नावाच्या व्यक्तीला । स्वामींनी योगाभ्यास शिकविला । षोडाक्षरी मंत्र त्यास दिला । म्हणे त्यास, कठीण हा योग मार्ग जरी, येईल तुज प्रयत्नाने ।।६ ।।
दीक्षा योगाची स्वामींनी दिली । निमोणकारावर कृपा झाली । धुमाळ-घरी त्याची भेट झाली । असे भक्तकृपाळू स्वामी गजानन ।।७।।
केलेल्या नवसाची विस्मृती झाली । तुकाराम कोकाटेला त्याची पुन्हा आठवण झाली । जेव्हा, त्याच्या मुलाची पृकृती
गंभीर झाली। त्याक्षणी स्वामींना वचन तुकारामाने दिले ।।८।।
स्वामी, नारायणास वाटू द्या बरे । मठात आणून सोडिन त्वरे। आता माझा शब्द ना विसरे । मनोमन वदे, तुकाराम कोकाटे ।।९।।
नारायण मठात आला । स्वामींच्या सेवेत राहिला । तुकारामाने नवस जो होता केला । तो त्याने पूर्ण केला ।।१०।।
स्वामी चरणी जे कबूल केलेले । ते पाहिजे पूर्ण केले । काम होता विसरले “। हे बरे नाही, हा बोध यातला भक्त हो
।।११।।
********
करी क्रमशः हे लेखन कवी अरुणदास
___________________________
कवी अरुणदास ” अरुण वि.देशपांडे- पुणे.
___________________________
