प्रशासनाला मदत व जाणीव करून देईन सुद्धा प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे एकीचा जीव गेला..
येत्या मंगळवारी करणार शहरातील खड्ड्यात बसून आंदोलन – रवी जाधव.
सावंतवाडी
किती हात प्रशासनाचा निष्काळजीपणा अखेर याच निष्काळजीपणामुळे एका निष्पाप सरकारी कर्मचारी महिलेचा जीव घेतलाच. निष्कृष्ट दर्जाचे रस्त्याचे काम करून प्रशासन व ठेकेदार आरामात आहेत परंतु येथील एका निष्पाप महिलेचा जीव गेला याला असे कित्येक जीव रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे जात आहे याला जबाबदार कोण. सन्माननीय पालकमंत्री, खासदार व आमदार यांनी या गंभीर विषयात विशेष लक्ष घालून गांभीर्य नसलेल्या प्रशासनावर योग्यअशी कारवाई करणे गरजेचे आहे .
प्रशासनाला प्रत्येक वेळा सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्वखर्चाने सहकार्य केले जाते रस्त्यावरील ठराविक खड्डे, आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदत करणे, रस्त्यावर पडलेली झाडे तोडून बाजूला करणे, अपघातग्रस्तांना मदत,अपघात होऊ नये म्हणून रस्त्यावर पडलेले बॅनर उचलणे, शासनाकडून वेळेत न मिळालेल्या रुग्णपयोगी वस्तूंची हॉस्पिटलला पूर्तता करणे हे वारंवार सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत असते कारण सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान येथे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाला प्राधान्य देते परंतु या सहकार्याचा प्रशासनाकडून गैरफायदा घेऊन आपली जबाबदारी झटकून टाकली जाते.
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या “जीवनरक्षण” अभियानाला प्रशासनाने हलक्यात घेऊ नये येत्या रविवार पर्यंत शहरातील, बस स्टॅन्ड तसेच हायवे वरील खड्डे चार दिवसात बुजवले गेले नाही तर येत्या मंगळवारी सकाळी ठीक दहा वाजता सावंतवाडीच्या शहरातील ठिकठिकाणच्या खड्ड्यात बसून शहरातील व गावातील सर्व सामाजिक संघटनांना सोबत घेऊन सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येणार आहे यामध्ये वाहतुकीस अडथळा किंवा जनतेच्या रोषाला प्रशासनाला सामोरे जावे लागल्यास याची सर्व जबाबदारी प्रशासनाने घ्यावी परंतु जोपर्यंत खड्डे बुजवले जाणार नाही तोपर्यंत खड्ड्यात बसून आंदोलन चालू राहणार आहे या संदर्भाचे नियोजन आज सदर प्रशासनाला दिले जाणार आहे तरी याची नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम व एसटी महामंडळ या तिन्ही प्रशासनाने याची नोंद घ्यावी अन्यथा जमत नसेल तर तसे आम्हाला लेखी द्यावे आम्ही त्याबाबत योग्य ती कारवाही करू असा इशारा रवी जाधव यांनी दिला आहे.
