*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री विजया केळकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*ब्रह्मचारिणी*
शक्ती ही तपोबलात
सांगे देवी ब्रह्मचारिणी रुपात
एकत्व शिवतत्वात
अपर्णा,पार्वती तिला जाणतात
हृदयाच्या गाभार्यात
टाळ मृदंग डमरु वाजतात
आचारात विचारात
दिव्य प्रकाश चैतन्य निर्मितात
जपमाळ देई दृष्टांत
नव प्रेरणा उपजे अंतरात
नवसृष्टी आकारात
स्त्रीत्व स्त्रिचे होकारात नकारात
कमंडलु तो हातात
खोलवरचे यावे स्मरणात
मग्न व्हावे स्व ध्यासात
जावे समाधी विश्वात विश्वासात
मृदुलता जीवनात
वसे स्त्रीदेवतेच्या समर्पणात
मी कोण? अशा शोधात
सापडावी मानसिक सामर्थ्यात
विजया केळकर_____
नागपूर
