You are currently viewing राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी गंगामाईच्या खेळाडूंची निवड

राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी गंगामाईच्या खेळाडूंची निवड

इचलकरंजी : प्रतिनिधी

 

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक कल्याण विभागामार्फत दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज चषक व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजित केल्या जातात. यावर्षी सदर स्पर्धा बुलढाणा येथे होत आहेत. या स्पर्धेसाठी कोल्हापूर विभागीय व्हॉलीबॉल संघामध्ये इचलकरंजी येथील श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलच्या पाच खेळाडूंची निवड झाली आहे. यामध्ये समीक्षा काशिलिंग मिठारी, रोझा समीर कलावंत, अनन्या अमोल मळोद, श्रावणी प्रमोद रवंदे, सादिया जमालशाह फकीर यांचा समावेश आहे.सर्व खेळाडूंना क्रीडाविभाग प्रमुख प्रा. शेखर शहा, क्रीडाशिक्षक डॉ. राहुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.

या निवडीबद्दल मुख्याध्यापिका श्रीमती एस. एस. गोंदकर, उपमुख्याध्यापिका सौ. एस. एस. भस्मे, उपप्राचार्य आर. एस. पाटील, पर्यवेक्षक व्ही. एन. कांबळे, पर्यवेक्षक एस. व्ही. पाटील यांनी सदर खेळाडूंचे अभिनंदन केले.या निवडीसाठी श्री ना. बा. एज्युकेशन सोसायटीचे प्रेसिडेंट श्रीनिवास बोहरा, चेअरमन कृष्णा बोहरा, व्हाईस चेअरमन उदय लोखंडे, खजिनदार राजगोपाल डाळ्या, मानद सचिव बाबासाहेब वडिंगे, स्कूल कमिटी चेअरमन मारुतराव निमणकर, विश्वस्त अहमद मुजावर, विश्वस्त महेश बांदवलकर तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी व विश्वस्त यांचे सहकार्य लाभले.तसेच कोल्हापूर जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनचे शिवाजी पाटील यांचेही विशेष सहकार्य लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 + eight =