पावसावर मात करत ‘हवेलीनगर उत्कर्ष मंडळा’चा नवरात्री शुभारंभ उत्साहात
फोंडाघाट (प्रतिनिधी):
फोंडाघाट येथील हवेलीनगर उत्कर्ष मंडळातर्फे राधाकृष्ण मंगल कार्यालयात नवरात्रीच्या कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात श्री. साई मंदिरात नारळ ठेवून करण्यात आली. अध्यक्ष राजू साटम यांनी गाराणे घालून नवरात्रीचे ९ दिवस कार्यक्रम निर्विघ्न पार पडो व पावसाचा अडथळा थांबो, अशी प्रार्थना देवीचरणी केली.
यानंतर राधाकृष्ण मंगल कार्यालयात सामाजिक कार्यकर्ते श्री. अजित नाडकर्णी यांच्या हस्ते फित कापून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. श्री. रमेश भोगटे व नागेश कोरगांवकर यांच्या हस्ते नारळ वाढवून वटवृक्षाला सांगणे करून दांडियाला सुरुवात झाली.
पावसाने काही काळ कार्यक्रमात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, मात्र मंडळाने यावर मात करत उत्सव चालू ठेवला. यावेळी रमेश भोगटे यांनी अजित नाडकर्णी व भावेश कराळे यांचे नाव घेऊन, कार्यक्रम हॉलमध्ये स्थानांतरित करून सुद्धा उत्साह कायम ठेवल्याबद्दल मंडळाचे अभिनंदन केले.
श्री जय माताजी!
— शुभांजीत सृष्टी, संवाद मीडिया ✒️🖊️
