You are currently viewing वैभववाडी तालुका सहकारी संघात उत्कृष्ट शेतकऱ्यांना पुरस्कार जाहीर

वैभववाडी तालुका सहकारी संघात उत्कृष्ट शेतकऱ्यांना पुरस्कार जाहीर

२७ सप्टेंबर रोजी वार्षिक सर्वसाधारण सभेत मान्यवरांच्या हस्ते होणार सन्मान

 

वैभववाडी :

वैभववाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या वतीने तालुक्यातील शेती व शेती पूरक व्यवसायामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

यामध्ये उत्कृष्ट भात पीक शेतकरी म्हणून संभाजी रावराणे (सांगुळवाडी), उत्कृष्ट काजू पीक शेतकरी विलास देसाई (एडगाव), उत्कृष्ट ऊस पीक उत्पादक विलास नावळे (लोरे), प्रयोगशील शेतकरी गौरी परब माईणकर (तिथवली), पशुपालक शेतकरी अरविंद पेडणेकर (नाधवडे), उत्कृष्ट नाचणी उत्पादक गोपाळ कृष्ण बचत गट समूह (महेश संसारे मांगवली) यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत.

या सर्व शेतकऱ्यांचा दिनांक २७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ठीक ११ वाजता संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सन्मान चिन्ह, शाल व श्रीफळ देऊन मान्यवरांचे हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.

त्याचबरोबर या आर्थिक वर्षापासून ज्या विकास संस्थांनी खरीप हंगाम सन २०२४-२५ मध्ये खत उच्चल करून त्या खताची येणे बाकी पूर्ण फेड केली आहे. अशा संस्थांचा सुद्धा वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सन्मानचिन्ह शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती चेअरमन प्रमोद रावराणे यांनी दिली.

या सर्वसाधारण सभेला व मेळाव्याला सर्व सभासदांनी उपसि राहावे. असे आवाहन चेअरमन प्रमोद रावराणे व व्हा. चेअर अंबाजी हुंबे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा