नवरात्रोत्सवानिमित्त चराठा येथे आज दशावतारी नाटक.
सावंतवाडी
चराठा तळखांबावाडी येधील चंद्रकांत शिंदे यांच्या निवासस्थानी साजरा होणाऱ्या नवरात्रोत्सवानिमित्त सोमवार, २२ सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता निरवडे येथील देव सातपाटेकर नाट्य मंडळाचा दशावतार ‘वज्रधारिणी इंद्रेश्वरी’ नाट्यप्रयोग होणार आहे. नाट्यरसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन चराठा तळखांबावाडी येथील दुर्गाभवानी प्रतिष्ठानचे पदाधिकारी चंद्रकांत शिंदे, दत्तप्रसाद शिंदे यांनी केले आहे. दरवर्षी चंद्रकांत शिंदे यांच्या दुर्गाभवानी प्रतिष्ठान येथे नवरात्रोत्सव साजरा केला जातो. यानिमित रोज सकाळी धार्मिक कार्यक्रमांसह भजन, दशावतारी नाटक असे कार्यक्रम होणार आहेत. लाभ घ्यावा, असे आवाहन दत्तप्रसाद शिंदे यांनी केले आहे.
