*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे पट्ट शिष्य
*”श्री ब्रह्मानंद महाराज यांचे पुण्यतिथीनिमित्त गीत”*
ब्रह्मचैतन्य ब्रह्मानंद उच्च कोटीचे संत
गुरु शिष्यांनी नाम प्रचारार्थ वेचिले जीवनIIधृII
सर्वांकडून दुर्लक्षित सोडती घर अनंत
बदामी मातेचे घेती दर्शन होती विरक्त
जल समाधी घेण्या जाता माता करी परावृत्तII1II
माता द्रष्टी महान कार्यार्थ देई स्फूर्ती दृष्टांत
अनंत पोहोचती वेंकटापुरी एकटे चालत
नामजप अनुष्ठान करिती विरक्ततेतूनII3II
व्यंकोबा भूगर्भातून प्रकटती देती दृष्टांत
गुरु शोधार्थ जाती इंदुरी होण्या अनुग्रहित
अर्पिती सर्वस्व बुद्धी गुरुचरणी नम्रतेनं II4II
काही काळ राहिले गुरु सेवेंत गोंदवल्यात
गुरु आज्ञेने आले धर्म रक्षण्या कर्नाटकात
तेरा कोटी जप केला नरपुर रथपुर वेणुपुरांतII5II
गुरु शिष्य राष्ट्रासाठी कार्य करती महान
काळाने ठरविले थोर करती मार्गदर्शन
द्रष्टे दोघे अंर्तज्ञानी योगी पुरुष सिद्धII6II
गुरु शिष्यांनी निर्मिली राम मंदिरे भारतांत
सर्वांना लावले रामनामाचे वेड दिले आंदण
धर्म प्रचारार्थ दोघांनी अर्पिले जीवनII7II
सर्वांचे चालवती संसार उत्सव अव्याहत
रामनामाचा प्रचार होई सर्वत्र अखंड
जाऊ दोघांनाही शरण मिळे आशीर्वादII8II
श्री अरुण गांगल. कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677.
