You are currently viewing सावंतवाडीत आयोजित जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत कु. दिव्या दिलीप राणे हिला द्वितीय क्रमांक

सावंतवाडीत आयोजित जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत कु. दिव्या दिलीप राणे हिला द्वितीय क्रमांक

सावंतवाडीत आयोजित जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत कु. दिव्या दिलीप राणे हिला द्वितीय क्रमांक

गावकऱ्यांकडून अभिनंदन

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा. श्री. रवींद्र चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत 18 वर्षांखालील मुलींच्या गटात कु. दिव्या दिलीप राणे हिने द्वितीय क्रमांक पटकावत आपल्या गावाचे नाव उज्वल केले आहे.

ही स्पर्धा सावंतवाडी येथे मोठ्या उत्साहात पार पडली. कु. दिव्या हिच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे तिच्या क्रीडा कौशल्याची जिल्ह्यात ठळक नोंद झाली आहे. तिच्या या यशाबद्दल गावातील सर्व नागरिकांनी व हितचिंतकांनी तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

गावाच्या वतीने कु. दिव्या दिलीप राणे हिला हार्दिक अभिनंदन करण्यात आले असून, अशा होतकरू खेळाडूंमुळे ग्रामीण भागातील युवा पिढीला प्रेरणा मिळत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा