*छत्रपती संभाजी नगर मध्ये सत्यवान रेडकर सरांचे तिमिरातूनी तेजाकडे मार्गदर्शन यशस्वीरित्या संपन्न*
मनूर, ता. वैजापूर
दिनांक, २१ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळच्या सत्रात, छत्रपती संभाजी मंगल कार्यालय, मनूर, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर येथे विद्यार्थी तसेच पालकांसाठी भव्यदिव्य निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
पार्थ एज्युकेशन फौंडेशनच्या वतीने वासुदेव राठोड सर, संचालक यांनी कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला होता. या व्याख्यानास श्री. संभाजी निकम पाटील (सामाजिक कार्यकर्ते) यांच्या समन्वय व संकल्पनेतून महाराष्ट्रातील उच्चविद्याविभूषित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, श्री. सत्यवान यशवंत रेडकर, वरिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार यांनी प्रमुख मार्गदर्शक स्वरूपात उपस्थितांना अत्यंत सोप्या भाषेत ग्रामीण भागातील विद्यार्थी भविष्यात प्रशासकीय सेवेत दाखल कसा होऊ शकतो या अनुषंगाने इत्यंभूत माहिती देऊन मार्गदर्शन केले. यावेळेस मनूर गावचे सरपंच, मुख्याध्यापक, शिक्षक सुद्धा व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रम समाप्तीच्या वेळेस विद्यार्थी व पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थी व पालकांनी या व्याख्यानाचा मनमुराद आनंद लुटला.
भविष्यातही असे उपक्रम पार्थ एज्युकेशन फौंडेशनच्या वतीने निरंतर केले जाऊन संभाजी नगर मधील जास्तीत जास्त विद्यार्थी, विविध प्रशासकीय सेवेत दाखल होणारच असा आत्मविश्वास श्री. वासुदेव राठोड सर यांनी व्यक्त केला.
