रोणापाल माऊली मंदिरात नवरात्रोत्सव निमित्त कार्यक्रम
बांदा
रोणापाल येथील श्रीदेवी माऊली मंदिरात नवरात्रोत्सव निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. यानिमित सोमवार २२ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वा. स्थानिकांची भजने होतील.
मंगळवार २३ रोजी रात्री ८ वा. ‘आठवणीतील दशावतार’ नाट्यप्रयोग सादर होईल. २४ रोजी श्री देवी माऊली दशावतार नाट्यमंडळ इन्सुली यांचा नाट्यप्रयोग, २५ रोजी निमंत्रित भजने सादर होतील. २६ रोजी सकाळी १० वा. सत्यनारायण महापूजा व रात्री ८ वा. जय हनुमान दशावतार नाट्यमंडळ, आरोस यांचा नाट्यप्रयोग होणार आहे.
शनिवार २७ रोजी ओमकार डान्स अकॅडमी ऑर्केस्ट्रा, सावंतवाडी यांचे सादरीकरण, २८ रोजी स्वामी दयासागर छात्रालय, रोणापाल यांचा कार्यक्रम होणार आहे. २९ रोजी मोरेश्वर पारंपारिक दशावतार नाट्यमंडळ, मोरे यांचा प्रयोग, ३० रोजी फुगडी व दांडिया आणि १ ऑक्टोबर रोजी खेळ पैठणीचा श्रीमान श्रीमतीचा प्रयोग रंगणार आहे.
उत्सवाचा समारोप २ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वा. पावणी, देवलग्न व दसरोत्सव कार्यक्रमाने होणार आहे. दररोज दुपारी १२ वा. आरती व महाप्रसाद होईल. भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री देवी माऊली सांस्कृतिक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
