झाराप येथे बँक ऑफ इंडिया एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला, ५ सराईत गुन्हेगार अटकेत
सिंधुदुर्गनगरी :
कुडाळ मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या झाराप येथील बँक ऑफ इंडियाच्या एटीएम फोडण्याचा प्रयत्न बुधवारी मध्यरात्री करण्यात आला. मात्र, कुडाळ पोलिसांच्या तत्काळ कारवाईमुळे हा प्रयत्न फसला. यावेळी सदर बँक एटीम मध्ये असलेले सुमारे ९ लाख ५० हजार रुपये वाचवण्यात यश आले होते. अटक करण्यात आलेले आरोपी सराईत गुन्हेगार असून आरोपी क्रमांक १ वर कर्नाटक तसेच इंदापूर येथे गुन्हे दाखल असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ मोहन दहीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
१८ सप्टेंबर रोजी मध्यरात्री झाराप येथील बैंक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये चोरट्यांनी घुसून गॅस कटर, एलपीजी गैस सिलिंडर व इतर साहित्यासह एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, नवी मुंबई येथील एटीम सेंट्रल कंट्रोल युनिट कडून मिळालेल्या संदेशानुसार नाईट पेट्रोलिंग ला असलेल्या कुडाळ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
पोलीस येत असल्याचा सुगावा लागताच चोरटयांनी साहित्य टाकून घटनास्थळावरून पळ काढला होता. घटनास्थळी एक गॅस कटर, एलपीजी ९ गॅस सिलिंडर, पाना, मास्क, हँडग्लोव्हज यांसह विविध साहित्य आढळून आले आहे. सीसीटीव्ही कॅमेरा झाकण्यासाठी चोरट्यांनी चिकटपट्टी लावल्याचे निदर्शनास आले होते.
गुन्हयाच्या घटनास्थळी मिळुन आलेला मुद्देमाल व तांत्रीक विष्लेषणाव्दारे आरोपी हे इंदापुर जि. पुणे येथील असल्याचे उघड झाले. त्यानंतर तात्काळ कुडाळ पोलीस ठाणेचे सहा. पोलीस निरीक्षक, जयदीप पाटील व पोलीस अंमलदार यांना पुणे इंदापुर येथे रवाना करत आरोपी क्र १) किरण बाळु चव्हाण वय-२९ वर्षे, रा. वनगळी ता. इंदापुर, जि. पुणे २) विजय दिनानाथ जाधव वय १९ वर्षे, रा. वनगळी ता. इंदापुर, जि. पुणे ३) मारुती गोविंद सुरवसे वय-१९ वर्ष, सध्या रा. वनगळी ता. इंदापुर, जि. पुणे, मुळ रा. कोराळ ता. उमरगा, जि. उस्मानाबाद ४) समाधान शहाजी यादव वय-२७ वर्षे, रा. बाबुळगाव ता. इंदापुर, जि. पुणे ५) औदुंबर राजकुमार शेलार वय-२७ वर्षे, रा. पळसदेव ता. इंदापुर जि. पुणे यांना त्यांचे राहते घरातून ताब्यात घेण्यात आले.
यापैकी आरोपी क्रमांक १ किरण बाळू चव्हाण याच्या कडे एसबीआय ची १२ एटीम कार्ड, एचडीएफसी बँकेची ०३ एटीम कार्ड, कर्नाटका बँकेची ०२ एटीम कार्ड, युनियन बँकेची ०२ एटीम कार्ड, केनरा बँकेची ०३ एटीम कार्ड तसेच बँक ऑफ महाराष्ट्र, बैंक ऑफ इंडीया, आयडीबीआय बँक, एक्सीस बँक, कोटक बैंक यांची प्रत्येकी ०१ एटीम असे एकुण २७ एटीम कार्ड, ०२ मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत.
आरोपीत क्रमांक ०४ समाधान शहाजी यादव याचे अंगझडतीत ०१ मोबाईल व आरोपीत क्रमांक ०५ औदुंबर राजकुमार शेलार याचे अंगझडतीत ०१ मोबाईल जप्त करण्यात आलेला आहे. तसेच आरोपीत यांनी गुन्हयात वापरलेली एक इंटींगा कार क्रमांक MH XQ २६९७, ०१ पल्सर मोटार सायकल (रजीस्ट्रेशन नंबर नाही), एक ऑक्सीजन गैस सिलेंडर, एक एलपीजी सिलेंडर व गॅस कटर असे जप्त करण्यात आलेले आहेत.
सदर गुन्हयात एकुण ०५ आरोपीत यांना अटक करण्यात आलेलो असुन त्यांचेकडे गुन्हयाच्या अनुषंगाने अधिक तपास चालू आहे. सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग डॉ. मोहन दहिकर, मा. अप्पर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग कु. नयोमी साटम, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सावंतवाडी विनोद कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम कुडाळ पोलीस ठाणे, सपोनि/ वैशाली आडकुर, सपोनि जयदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक/ प्रविण धडे, मसपोफी/९३९ जाधव, पोहेको/१०११ बंडगर, पोहेकी १२० कदम, पोहेकॉ/७४४ वेंगुर्लेकर, पोहेको/१११३ बांदेकर, पोहेकों/७०३ पाटील, पोना/११९७ गुरव, पोको १८४ गणेश चव्हाण, पोको/४०५ भोई, पोकों/४७३ मळगावकर, मपोको/१२९६ भागवत सर्व कुडाळ पोलीस ठाणे यांनी केलेली आहे. तसेच नमुद पथकास गुन्हयाची उकल करणे व आवश्यक तांत्रीक मदत सायबर पोलीस ठाणे सिंधुदुर्ग व त्यांचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे यांनी केलेली आहे.
बैंक ऑफ इंडियाच्या झाराप येथील एटीएममध्ये चोरीच्यावेळी सुमारे ९ लाख ५० हजार रुपयांची रोकड होती. बँकेचे अधिकारी गुरुप्रीत सिंग यांनी दिलेल्या तक्रारीवरून दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कुडाळ शहरात अशा प्रकारे एटीम फोडून रोकड चोरी करण्याची ही गेल्या काही महिन्यांतील दुसरी घटना आहे. पहिल्या घटनेवेळी ही कुडाळ पोलिसांनी चांगली कामगिरी करत काही आरोपींना ताब्यात घेऊन सुमारे दहा लाखांची रोकड हस्तगत केली होती.
