You are currently viewing हुमरमळा (वालावल) गावाला ग्रामसेवक अपर्णा पाटील आणि तलाठी पुजा भोरे हे दोन्ही अधिकारी कार्यतत्पर मिळालेले आहेत – – – सरपंच श्री अमृत देसाई!

हुमरमळा (वालावल) गावाला ग्रामसेवक अपर्णा पाटील आणि तलाठी पुजा भोरे हे दोन्ही अधिकारी कार्यतत्पर मिळालेले आहेत – – – सरपंच श्री अमृत देसाई!

हुमरमळा (वालावल) गावाला ग्रामसेवक अपर्णा पाटील आणि तलाठी पुजा भोरे हे दोन्ही अधिकारी कार्यतत्पर मिळालेले आहेत – – – सरपंच श्री अमृत देसाई!

कुडाळ (प्रतिनिधी)

हुमरमळा वालावल गावातील लोकांच्या समस्या महसुल आणि ग्रामपंचायत या दोन्ही बाजुने सुटत असुन ग्रामसेविका श्रीम अपर्णा पाटील आणि तलाठी कु पुजा भोरे या दोन्ही काम उत्कृष्ट करणा-या असल्यानेच गावातील लोक समाधानी आहेत असे गौरवोद्गार हुमरमळा वालावल सरपंच श्री अमृत देसाई यांनी काढले
हुमरमळा वालावल ग्रामपंचायत मध्ये 17 सप्टेंबर ते 2 आॅक्टोबर पर्यंत शासनाच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात येत असल्याने ग्रामपंचायती मध्ये दाखले वाटप कार्यक्रमात सरपंच श्री देसाई बोलत होते
यावेळी आरोग्य आणि अंगणवाडी यांचेही काम चांगल्या पध्दतीने आहे असेही श्री देसाई म्हणाले
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे, ग्रामसेविका अपर्णा पाटील तलाठी पुजा भोरे, आरोग्य कर्मचारी श्री ओटवणेकर, अंगणवाडी सेविका मिताली देसाई, अंगणवाडी सेविका सौ प्रिती प्रमोद वेंगुर्लेकर, ग्रामपंचायत सदस्या हेमांगी कद्रेकर, ग्रामपंचायत सदस्या सौ परब, बांधकोडवाडी शाळा मुख्याध्यापक, नाथा राणे, भारती परब, शैलेश मयेकर, अमित बंगे आदी उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा