भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना डोंबिवलीत जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा
डोंबिवली
भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्रजी चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आज डोंबिवली येथे त्यांना जिल्ह्याच्या वतीने भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत यांनी सस्नेह शुभेच्छा प्रदान केल्या.
या भेटीदरम्यान चव्हाण यांच्याशी सौहार्दपूर्ण संवाद साधत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पक्षाची वाढ, भजन कलेच्या संवर्धनासाठी सुरू असलेले उपक्रम आणि विविध सामाजिक कार्यांबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी प्रभाकर सावंत यांनी चव्हाण यांना सुदीर्घ आयुष्य व उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा देत, आगामी काळात त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष अधिक बळकट होईल असा विश्वास व्यक्त केला.

