देवगड ग्रामीण रुग्णालय येथे सर्व रोग निदान शिबिर २५ सप्टेंबर रोजी
देवगड
१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत संपूर्ण देशभर महिला आरोग्य तपासणी ,उपचार व समुपदेशन सेवा याबाबत *स्वस्थ नारी, सशक्त परिवार* अभियान राबविण्यात येत असून,या अंतर्गत ग्रामीण रुग्णालय ,देवगड येथे *सर्व रोग निदान शिबिर* गुरुवार दिनांक *२५ सप्टेंबर* रोजी सकाळी १०:०० ते दुपारी २:०० या वेळेत आयोजन करण्यात आले आहे.
सदर शिबिरामध्ये स्त्री रोग तज्ञ ,बाळ रोग तज्ञ, नेत्र रोग तज्ञ, कान नाक घसा तज्ञ , दंत शल्यचिकित्सक, मानसोपचार तज्ञ, अस्थिरोग तज्ञ, सर्जन उपस्थित राहणार आहेत
रक्तदाब, मधुमेह, रक्तक्षय, क्षयरोग, कोलेस्ट्रॉल, लिवर, किडनी संबंधी तपासणी, कर्करोग तपासणी, मानसिक स्वास्थ्य किशोरवयीन स्वास्थ्य पोषक आहार या विषयांवर समुपदेशन ह्या सुविधा उपलब्ध आहेत.
या सोबतच नागरिकांचे वय वंदना कार्ड, आयुष्मान कार्ड, काढण्याची सुविधा या शिबिरात उपलब्ध आहे.
नेत्रदान, अवयवदान कोणाला करायचे असल्यास त्याचे फॉर्म भरून दिले जातील.
तरी सर्व महिलांनी व बालकांनी सदर शिबीरला उपस्थित राहून या सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन
डॉ प्रकाश पाटोदेकर वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय देवगड यांनी केले आहे.

