“भाजप महिला मोर्चा सिंधुदुर्गतर्फे बांदा येथे महिला उद्योजिका रोजगार मेळाव्याचे यशस्वी आयोजन”
बांदा –
भारतीय जनता पार्टीच्या सेवा पंधरवडा आणि विकास दिवसाचे औचित्य साधून भाजप महिला मोर्चा सिंधुदुर्ग, बांदा-इन्सुली जिल्हा परिषद गट यांच्या वतीने महिला उद्योजिकांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन आज आनंदी मंगल कार्यालय, बांदा येथे उत्साहात पार पडले.
या कार्यक्रमास भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत, उपाध्यक्ष श्री. प्रमोद कामत, चिटणीस महेश धुरी, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता ताई कोरगांवकर, शर्वरी गावकर, मानसी धुरी, उन्नती धुरी, सरपंच प्रियांका नाईक, वेदिका नाईक, मंडळ अध्यक्ष स्वागत नाटेकर, रूपाली शिरसाट, स्मिता पेडणेकर, शिल्पा सावंत, सुचिता शिंदे, श्रुती वळंजू, तनुजा वराडकर, लक्ष्मी सावंत, प्रगती देसाई, श्रिया केसरकर, मिताली परब, बाळू सावंत, मधुकर देसाई, गुरु कल्याणकर, बाबा काणेकर, बाळा आकेरकर, शितल राऊळ, राकेश केसरकर, निलेश कदम, शैलेश केसरकर, योगेश केनी, नितीन सावंत, जयेश सावंत, संजय डिगणेकर आणि उमेश पेडणेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
बांदा-इन्सुली जिल्हा परिषद महिला वर्ग तसेच भाजपचे विविध प्रमुख पदाधिकारी यांचे विशेष सहकार्य लाभले.
या मेळाव्याचे विशेष आकर्षण म्हणजे राष्ट्रीय सदस्य लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योग मंत्रालयाचे श्री. विजय केनवडेकर यांचे मार्गदर्शन. त्यांनी उपस्थित महिलांना उद्योगसंधी, मार्गदर्शन व योजनांची माहिती दिली.
या कार्यक्रमातून महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी नवे मार्ग आणि प्रेरणा मिळाली असून, हा उपक्रम यशस्वी ठरल्याबद्दल आयोजकांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
