You are currently viewing स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी ध्येय, जिद्द आणि चिकाटी ठेवून प्रगती साधा – अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे

स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी ध्येय, जिद्द आणि चिकाटी ठेवून प्रगती साधा – अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे

सिंधुदुर्ग :

आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासापुरते मर्यादित न राहता, विविध राष्ट्रीय प्रज्ञाशोध, अब्दुल कलाम स्पर्धा परीक्षा, जनरल नॉलेज अशा उपक्रमांमधून आपले आत्मज्ञान वाढवावे. ध्येय, जिद्द आणि चिकाटी यांचा आधार घेतल्यास प्रत्येक विद्यार्थी आपल्या जीवनात उत्तुंग यश संपादन करू शकतो, असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती शुभागी साठे यांनी केले.

सुकळवाड येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत ‘प्रेरणा दिना’च्या औचित्याने श्रीमती साठे यांनी शाळेला भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक बाळकृष्ण नांदोस्कर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यांनी शाळेची पटसंख्या, लोकवर्गणीतून होत असलेले उपक्रम, प्रधानमंत्री पोषण शक्ती अभियान, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान, सेवा पंधरवडा अशा विविध योजनांची माहिती दिली. गावचे उपसरपंच किशोर पेडणेकर यांनीही शाळेला मिळणारे गावकऱ्यांचे सहकार्य अधोरेखित केले.

श्रीमती साठे म्हणाल्या, गेल्या जूनमध्ये मी या शाळेला भेट दिली होती. आज प्रेरणा दिनाच्या निमित्ताने पुन्हा आले आहे. शाळेतील उपक्रम, शैक्षणिक गुणवत्ता आणि गावकऱ्यांचे सहकार्य हे स्तुत्य आहे. सामाजिक दृष्टी ठेवून हे सहकार्य सातत्याने मिळाले, तर सुकळवाड शाळा केवळ तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यातही उत्तुंग क्रमांक पटकावेल असेही त्या म्हणाल्या.

या कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील पाताडे, शिक्षकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा