You are currently viewing नागवे ग्रा.प.सदस्यांसह शिवसैनिक भाजपात दाखल

नागवे ग्रा.प.सदस्यांसह शिवसैनिक भाजपात दाखल

आमदार नितेश राणे यांनी केले स्वागत

गाव विकासाठी राणे सोबत : तेली, जाधव

कणकवली
नागवे ग्रामपंचायत सदस्य मंगेश तेली, सिद्धीका जाधव व सिद्धेश माजगावकर या शिवसेना पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.आमदार नितेश राणे यांनी त्यांचे भाजपात स्वागत केले.ओमगणेश निवासस्थानीं सर्व प्रवेश कर्त्यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी भजपा तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री,तालुका कार्यकारिणी सदस्य राजू पाटकर, बूथ अध्यक्ष सत्यवान कुडाळकर,युवा मोर्चा चे सचिन खेडेकर, महेंद्र कुडाळकर, प्रवीण सांगवेकर आदी उपस्थित होते. आमदार नितेश राणे यांच्या नेतूत्वाखाली कणकवली विधानसभा मतदार संघात ज्या पद्धतीने विकास कामे चालू आहेत त्याचा विचार करता नागवे गावच्या विकासाठी भाजपच्या सोबत सक्रिय काम करणे गरजेचे आहे आणि त्याच साठी भाजपात आम्ही सक्रिय प्रवेश करत आहोत अशी माहिती ग्रापपंचायत सदस्य मंगेश तेली ,सिद्धीका जाधव यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × five =