रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त विजयदुर्ग किल्ल्यावर भव्य स्वच्छता अभियान – महेश उर्फ बंड्या नारकर
देवगड
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व सिंधुदुर्गचे सुपुत्र आमदार रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सेवापंधरवड्याच्या निमित्ताने विजयदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. भाजप पडेल मंडळाच्या वतीने ही मोहीम उद्या सकाळी १० वाजता राबविण्यात येणार आहे.
या उपक्रमाची माहिती भाजप पडेल मंडळाचे अध्यक्ष महेश उर्फ नारकर यांनी दिली. मोहिमेत मंडळातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. स्वच्छ आणि सुंदर किल्ला ठेवण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात स्थानिकांनीही सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
