एक ही साफसफाई कामगार निलंबित नाही आणि होऊ पण देणार नाही सर्व सफाई कामगार कामावर रुजू- बबन साळगावकर
सावंतवाडी
आंदोलन केल्यामुळे जनतेला त्रास झाला हा ठपका ठेवून वीस साफसफाई कामगारांना ठेकेदाराकडून कामावरून कमी केलेल्याची काल नोटीस देण्यात आले होती परंतु एकाही परंतु सर्व कामगार कामावर रुजू आहे यापुढेही साफसफाई कंत्राटी कामगारावरती कारवाई होणार नाही याची दक्षता संघटना घेईल संघटनेचे बळ कामगारांच्या पाठीमागे आहे
नगरपरिषदेकडून एकही कामगार कमी केला गेला नाही सर्व कामगार कामावरती रुजू आहेत काम करत आहेत ही माहिती सॅनिटरी इन्स्पेक्टर विनोद सावंत यांनी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना दिली. थोडा वेळ जाईल परंतु न्याय हक्कासाठी कायद्याची लढाई कायद्यानेच लढू असे बबन साळगावकर व विलास जाधव यांनी सांगितले. येत्या पंधरा दिवसात कंत्राटी कामगारांना न्याय मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
साफसफाई कंत्राटी कामगारांनी प्रशासन, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर व विलास जाधव यांचे आभार मानले.

