स्नेह नागरी पत संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त चित्रकला स्पर्धा उत्साहात पार
सावंतवाडी (प्रतिनिधी) –
स्नेह नागरी सहकारी पत संस्था, सावंतवाडी यांच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त रविवारी, दिनांक 14 सप्टेंबर रोजी प्राथमिक शालेय मुलांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा सावंतवाडी येथील कलसुलकर हायस्कूलच्या हॉलमध्ये उत्साहात पार पडली.
या उपक्रमास विद्यार्थी व पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकूण 210 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. लहान वयात विद्यार्थ्यांच्या कला कौशल्याला व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल पालक वर्गाने स्नेह नागरी पत संस्थेचे आभार मानले.
या कार्यक्रमात रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी यांचाही सक्रिय सहभाग होता. रोटरी अध्यक्ष रो. सिद्धार्थ भांबुरे, रो. सिताराम तेली, रो. आबा कशाळीकर यांच्यासह स्नेह पत संस्थेच्या मुख्याधिकारी सौ. संगीता प्रभू, सौ. कोमल सावंत, श्री. रमेश निर्गुण, श्रीमती रईसा मुल्ला, मयुरी भगत, मानसी वेंगुर्लेकर, सौ. नेरुरकर यांनी विशेष सहकार्य केले.
स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिसे दिनांक 27 सप्टेंबर 2025 रोजी संध्याकाळी 5 वाजता NAB नेत्र रुग्णालय, भटवाडी, सावंतवाडी येथील पहिल्या मजल्यावरील हॉलमध्ये स्नेह पत संस्थेच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत.
या उपक्रमाची माहिती स्नेह पत संस्थेचे अध्यक्ष श्री. अनंत व्यंकटेश उचगावकर व श्री. सोमनाथ जिनी यांनी दिली.
