You are currently viewing सार्वजनिक बांधकाम विभागातील उल्लेखनीय कार्यगिरीबद्दल कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांना शासनाचा सन्मान

सार्वजनिक बांधकाम विभागातील उल्लेखनीय कार्यगिरीबद्दल कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांना शासनाचा सन्मान

सावंतवाडी :

सार्वजनिक बांधकाम विभागातील उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन २०२४-२५ या कालावधीसाठी देण्यात येणारे पुरस्कार शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहेत.

यामध्ये तांत्रिक संवर्ग (स्थापत्य) विभागातून सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्रक असे या पुरस्काराचे स्वरूप असून लवकरच पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्ते, पूल, विविध विभागांच्या इमारती व इतर सार्वजनिक बांधकामे करण्यात येतात. इमारती/पुलांची संकल्पना तयार करणे व इतर माध्यमांचा म्हणजे संगणकाचा उपयोग करून संकल्पनाचित्रे बनविणे, तसेच सार्वजनिक इमारतींची विद्युतिकरणाची कामे करताना व प्रकल्प शाबीत करताना लागणारे तांत्रिक कौशल्य अभियंत्यांकडे असते. यामुळे त्यांच्या कार्याचा थेट फायदा समाजाला होत असतो.

अशा अभियंत्यांची प्रशासकीय तसेच तांत्रिक कौशल्य लक्षात घेऊन त्यांचा वैयक्तिक पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो.

दरवर्षी १५ सप्टेंबर रोजी भारतरत्न सर विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिन “अभियंता दिन” म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्तानेच सार्वजनिक बांधकाम विभागातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अभियंत्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक प्रदान करून गौरविण्यात येते. यंदा या यादीत कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांचा समावेश झाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात आनंदाची लाट उसळली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा