You are currently viewing रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त पडेल भाजपा मंडल स्वच्छतेचा उपक्रम विजयदुर्गात राबविणार

रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त पडेल भाजपा मंडल स्वच्छतेचा उपक्रम विजयदुर्गात राबविणार

देवगड :

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आमदार रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पडेल भाजपा मंडळ यांच्या वतीने विजयदुर्ग किल्ल्याच्या परिसरात स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली आहे. सेवा पंधरवडा म्हणून साजरा होत असलेल्या या उपक्रमांतर्गत उद्या सकाळी १० वाजता ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

पडेल भाजपा मंडळाचे अध्यक्ष महेश उर्फ नारकर यांनी याबाबत माहिती दिली. या स्वच्छता मोहिमेमध्ये पडेल मंडळातील भाजपचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. तसेच स्थानिक नागरिकांचाही या उपक्रमात सहभाग मिळणार असून परिसर स्वच्छ व आकर्षक ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा