औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये विविध व्यवसायांकरीता अर्ज करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वेंगुर्ला या संस्थेत प्रवेश सत्र ऑगस्ट-२०२५ करिता मंजूर असलेल्या विविध व्यवसायांमधील जागांकरिता इच्छुक उमेद्वारानी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याचे आवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे प्राचार्य यांनी केले आहे.
राज्यातील शासकीय व खाजगी संस्थेतील शिल्प कारागिर प्रशिक्षण योजनेअंतर्गत ऑगस्ट – २०२५ सत्रातील प्रवेश प्रक्रीयेचे सुधारीत वेळापत्रक जाहीर करण्यात आले असुन दिनांक २० सप्टेंबर २०२५ पर्यंत ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे अर्ज निश्चित करणे नव्याने सुरु होणार आहेत. गुणवत्ता यादी दि. २१ सप्टेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध होणार आहे. तरी इच्छुक उमेद्वारानी प्रवेश अर्ज भरणे प्रक्रीया https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पध्दतीने आपले नव्याने नोंदणी करुन अर्ज जवळच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये निश्चित करावा.
प्रवेशोच्छुक उमेदवारांनी अधिकच्या माहितीकरिता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वेंगुर्ला येथे संपर्क साधावा असे प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वेंगुर्ला यांनी कळविले आहे.
