पांडव नगरी कोलगाव नवरात्रोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी बाबुराव चव्हाण यांची बिनविरोध निवड
तर उपाध्यक्षपदी विजय चव्हाण यांची नियुक्ती
सावंतवाडी
कोलगाव येथील पांडव नगरी श्री देव वस नवरात्रोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी बाबुराव चव्हाण यांची यंदाही बिनविरोध निवड झाली आहे. ते गेल्या सात वर्षांपासून अध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडत आहेत. यावर्षी मंडळाच्या सर्वसाधारण सभेत सर्वानुमते त्यांची निवड करण्यात आली.
मंडळाच्या नवीन कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्षपदी विजय चव्हाण, सचिवपदी आनंद चव्हाण, सहसचिवपदी रवींद्र चव्हाण, खजिनदारपदी सदानंद चव्हाण, सहखजिनदार अमोल चव्हाण यांचीही निवड झाली आहे. कार्याध्यक्ष म्हणून ॲड. स्वप्नील कोलगावकर यांची निवड झाली असून, मार्गदर्शक म्हणून पत्रकार सागर चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यावर्षीचा नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा निर्णय मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. नऊ दिवसांच्या या धार्मिक व सांस्कृतिक सोहळ्यात दशावतारी तीन नाटके, कीर्तन, प्रवचन, फुगडी, दांडिया, तसेच भजनांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
