भटवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते बबन डिसोजा यांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टाळा.
सावंतवाडी
गेल्या वादळी पावसामुळे गोविंद चित्र मंदिर ते भटवाडी या रस्त्यावर झाडांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली होती त्यात लाईटचे पोल व माड तुटून पडले होते त्यातील काही पोल व माड रस्त्याच्या बाजूच्या गटारामध्ये तसेच पडून होते त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होत होती व बऱ्याच वेळी त्या ठिकाणी अपघातही झाले होते ही बाब लक्षात घेऊन भटवाडी येथील बांधकाम व्यवसायिक व सामाजिक कार्यकर्ते बबन डिसोजा यांनी नगरपरिषद व एमईसीबी यांचे लक्ष वेधून याबाबत तात्काळ कारवाई करण्याचे आवाहन केले असता नगरपरिषद व एमईसीबी यांनी गटारामध्ये पडलेले माड व पोल तेथून लगेच हटवले त्यामुळे पुढे होणारी वाहतूक कोंडी व अपघात टाळणे शक्य झाले त्यांच्या या सतर्कतेचे तेथील नागरिकांकडून कौतुक होत आहे.

