You are currently viewing झोळंबे ग्रामपंचायतची विशेष ग्रामसभा उत्साहात

झोळंबे ग्रामपंचायतची विशेष ग्रामसभा उत्साहात

झोळंबे ग्रामपंचायतची विशेष ग्रामसभा उत्साहात

दोडामार्ग

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान शुभारंभाच्या निमित्ताने ग्रामपंचायत झोळंबेची आज (दि. १७रोजीची) ग्रामसभा ग्रामस्थांच्या प्रचंड प्रतिसादात उत्साही वातावरणात संपन्न झाली. यावेळी दोडामार्ग पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री.अजिंक्य सावंत यांची यावेळी विशेष उपस्थिती होती.
या ग्रामसभेचा शुभारंभ सरपंच विशाखा नाईक आणि सामाजिक कार्यकर्ते गणेशप्रसाद गवस यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आला. उपस्थित मान्यवरांचे स्वागत सरपंच विशाखा नाईक, उपसरपंच विनायक गाडगीळ, ग्रामसेवक नामदेव परब यांनी केले. यावेळी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची रुपरेषा आणि ग्रामस्थांचा सहभाग याबाबत ग्रामसभा निरीक्षक नितीन आरोंदेकर यांनी मार्गदर्शन केले. गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत यांनी अभियानात ग्रामस्थांनी एकजुटीने सहभाग घेण्याचे आवाहन केले. झोळंबे ग्रामपंचायतला चांगली पार्श्वभुमी असुन विविध स्पर्धेत ग्रामपंचायतने बाजी मारली आहे, असे सांगितले.
या ग्रामसभेला आरोग्यसेविका मीरा कुरुडे, सीएचओ निकीता नाईक, आशा सुप्रिया गवस, आरोग्यसेवक जेराॅन सोच, तलाठी श्रीराज सांभारे, पोलीस पाटील संजय गवस, शिक्षक संतोष गवस आदी शासकीय संस्थाप्रमुख उपस्थित होते.
यावेळी ग्रामसेवक नामदेव परब यांनी अभियानाची संपूर्ण माहिती दिली. उपस्थित ग्रामस्थांनी अभियान यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. यावेळी शुभारंभ प्रसंगी प्रत्यक्ष अंगणवाडी परिसरात स्वच्छता करुन शुभारंभ करण्यात आला. उपस्थितांचे आभार उपसरपंच विनायक गाडगीळ यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा