You are currently viewing अधीरता…

अधीरता…

 

शब्दही मुके जाहले,
बोलावे कुणाशी बोल.
बोलण्या अधीर ओठ,
रुसले शब्द हृदयांत खोल.
बोलावे कुणाशी….

झाली पहाट वेळ,
झाली पोरकी ही झाडे.
थवे पक्ष्यांचे उडुनी गेले,
दूर आसमानी गोल,
बोलावे कुणाशी…

ढग दाटले अंबरी,
मळभ आले वाटे हृदयी.
दुःख कंठाशी येऊनी थांबे,
नयनांतून सुकली ओल,
बोलावे कुणाशी….

मोरपीस गाली फिरले,
कोमल नाजूक ते भासले.
बेभान वाऱ्याने तुटले,
ना सावरला आपुला तोल,
बोलावे कुणाशी बोल….

(दिपी)✒️
दीपक पटेकर
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा